डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानकाजवळच्या महापालिका कार्यालयास अचानक भेट देऊन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सदर इमारतीची पाहणी केली, या इमारतीत दोन प्रभाग क्षेत्र कार्यालये असून तेथे नागरिकांची सतत वर्दळ असते तथापि सदर इमारत जुनी आणि सकृतदर्शनी धोकादायक झाल्याचे दिसत असल्यामुळे या इमारतीतील फ प्रभाग कार्यालय, समोरच असलेल्या पी.पी.चेंबर्सच्या इमारतीत आणि ग प्रभाग कार्यालय डोंबिवली पूर्व येथील सुनील नगर येथर आरक्षणांतर्गत उपलब्ध असलेल्या जागेवर हलवण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याच वेळी त्यांनी सुनील नगर येथील पार्किंग, भाजी मंडई व वाचनालयाच्या जागेची देखील पाहणी केली,

त्यानंतर डोंबिवली पूर्व येथील 90 फुटी रस्त्यावरील बालाजी अंगण या इमारतीत शॉपिंग मॉल या आरक्षणांतर्गत उपलब्ध असलेल्या सुमारे 10000 स्क्वेअर फूट जागेची पाहणी करून सदर जागा भाड्याने देणे बाबत निविदा सूचना प्रसिद्ध करण्याबाबतच्या सूचना त्यांनी मालमत्ता विभागाचे उपायुक्त पल्लवी भागवत यांना दिल्या. त्याचप्रमाणे दावडी येथील रीजन्सी या गृहसंकुलात कार्यान्वित असलेल्या कंपोस्टिंगच्या युनिट ची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली तसेच MIDC शीळ फाटा येथे कंपोस्टिंग सुरू करणे बाबत उपलब्ध असलेल्या प्लॉटची पाहणी देखिल त्यांनी यावेळी केली.