नेशन न्यूज मराठी टीम.
नवी /मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई येथील खारघरमध्ये डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने श्री सदस्य दाखल झाले होते. मात्र उष्मघाताच्या त्रासाने अनेक जणांना त्रास होऊन 8 ते 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर काही जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः एमजीएम रुग्णालयात रुग्णांचा आढावा घेतला. तसेच पूढील उपचार हे सुरु आहेत.झालेली घटना अत्यंत दुखद अशी आहे पण या निष्पाप लोकांचा बळी गेला याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.
Related Posts