सोलापूर/प्रतिनिधी – कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला असताना बहुचर्चित ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापूर मध्ये दाखल झाली असून तिचे आगमन गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील बाळे रेल्वे स्थानकार झाले.सोलापूर जिल्ह्याला ८ ऑक्सिजनचे टँकर मिळाले असून ते ओरिसा राज्यातील अंगुल येथून आले आहेत.ऑक्सिजन टँकर आल्याने ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास मदत होणार आहे.
ओरिसातून निघाल्यापासून ऑक्सिजन एक्सप्रेस ला ग्रीन कॉरिडॉर होता.त्यामुळे एक्सप्रेस न थांबता सोलापूरला आली.ऑक्सिजन टँकर रो रो सेवेद्वारे जिल्ह्यात आणण्यात आले आहेत.एक्सप्रेस सोलापूरकडे येत असताना चालक व गार्ड बदलण्यासाठी या एक्सप्रेसने मोजक्याच रेल्वे स्थानकावर काही मिनिटांचा थांबा घेतला.
सोलापूर शहर व ग्रामीण भागात दररोज दोन हजारच्या पुढे कोरोना रुग्ण सापडत असल्याने वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.त्याला यश आले असून गुरुवारी ऑक्सिजन एक्सप्रेस जिल्ह्यात दाखल झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असल्याचे दिसते.
ऑक्सिजन एक्सप्रेस बाळे रेल्वे स्थानकावर आल्यानंतर चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळे विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.