नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मस्जिद समोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत अचानक कोसळली. यात एकूण चार जण या इमारती खाली दबले गेले या त्यापैंकी तीन जणांना वाचविण्यात यश आले असून एक 75 वर्षे महिला या इमारतीखाली दबली गेलेली आहे तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. राजश्री सुरेश पाठक वय अंदाजे 75 ते 80 दरम्यान या इमारती खाकी अडकल्या आहेत.
जळगाव शहरातील शिवाजी नगरात पाठक यांची 74 वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीमध्ये ते राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीचे मालक पाठक कुटुंबीय कधीतरी या ठिकाणी पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. त्यानुसार या ठिकाणी आज पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी आले होते. याच दरम्यान अचानक ही तीन मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले व बचाव कार्य सुरू केले. यात तीन जणांना वाचविण्यात यश आले, तर एक 75 वर्षे महिला या ठिकाणी अडकलेली आहे. तिला वाचवण्यासाठी ही प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ते सापडल्यानंतर नेमके महिलेचे काय झाले हे समोर येणार आहे. दरम्यान या घटनेने मोठी खळबळ उडाली घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली त्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली.
मंत्री गुलाबराव पाटील यांनीही इमारत कोसळल्याच्या घटनेच्या ठिकाणी भेट दिली आहे. या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देत घटनेविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या ठिकाणी इमारतीचे मालक कुटुंबियांची ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेत त्यांना धीर दिला.
अनेक वर्षांपासून ही जीर्ण इमारत होती ती रिकामी करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित कुटुंबीयांना नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही ती इमारत रिकामी करण्यात न आल्याने आज ही दुर्घटना घडली आहे.