महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

अहमदनगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखाची मदत, चौकशी अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश

अहमदनगर/प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉकसक्रिटमुळे आग लागली. या विभागात १७ कोविड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे. नगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दलाने तसेच एमआयडीसी आणि लष्कराच्या दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, आग लागल्यावर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढले. अत्यवस्थ रुग्णांना इतर कक्षात स्थलांतरित करण्यात आले.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून दोषी असणाऱ्यांवर कारवाईचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्याच बरोबर मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख व NDRF मधून दोन लाख अशी सात लाख रुपये मदत देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश राजेश टोपे यांनी दिले आहेत.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×