नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्वाचे साधन पशुपालन आहे. कधी नैसर्गिक तर कधी कृत्रिम आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. विद्युत खांबावरील तार तुटल्याने सात जनावरांचा (Animal) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यामधील हरताळा गावात घडली आहे. शेतशीवारामध्ये जनावरे बांधून ठेवलेली असताना विद्युत खांबावरील तारा तुटल्याची माहिती हरताळा गावातील शेतकरी किशोर देशमुख यांनी दिली.
महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करून देखील कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. हा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरणने तात्काळ नुकसान भरपाई करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली. नुकसान भरपाई न मिळाल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.