नेशन न्युज मराठी टिम.
मुंबई – ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कल्याण केंद्रातून नवांकुर संस्कार मंच, कल्याण या संस्थेच्या हार्मनी बिटवीन… मिस्टर अँड मिसेस परस्पर या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे कल्याण केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे
गंधर्व गुरुकुल प्रतिष्ठान, टिटवाळा या संस्थेच्या स्टार या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि अभिनय, कल्याण या संस्थेच्या समतोल या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक सुशिल शिरोडकर (नाटक हार्मनी बिटविन… मिस्टर अँड मिसेस परस्पर), द्वितीय पारितोषिक राकेश जाधव (नाटक-स्टार), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक – स्टार), द्वितीय पारितोषिक ऋषिकेश वायदंडे (नाटक हार्मनी बिटविन… मिस्टर अँड मिसेस परस्पर), नेपथ्य : प्रथम पारितोषिक सुशील शिरोडकर (नाटक- हार्मनी बिटविन… मिस्टर अँड मिसेस परस्पर), द्वितीय पारितोषिक समिर तोंडवळकर (नाटक- स्टार), रंगभूषाः प्रथम पारितोषिक उल्हेश खंदारे (नाटक काऊन्ट डाऊन), द्वितीय पारितोषिक वैजयंता डोंगर (नाटक- सुर्यास्त), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुरेश शांताराम पवार (नाटक- साखरेचे पाच दाणे) व सुजाता डांगे (नाटक- हार्मनी बिटविन… मिस्टर अँड मिसेस परस्पर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे भाग्यश्री अशोक (नाटक-समतोल), अक्षता हाले (नाटक- स्टार), रंजना म्हाब्दी (नाटक-नथिंग टू से), सांची गांगण (नाटक- नजरकैद ), श्रुती लाड (नाटक-लंगर), विकास तांबे (नाटक- समतोल), सुशिल शिरोडकर (नाटक-हार्मनी बिटविन… मिस्टर अँड मिसेस परस्पर), तुषार ढेपे (नाटक-स्टार), कुणाल जाधव (नाटक- कॉफीन), सुमित चौधरी (नाटक-एक कहाणी गंमतीची).