नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/ प्रतिनिधी– देशात गहू आणि आट्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात उपाय योजना करण्याच्या भारत सरकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून, गव्हाच्या साप्ताहिक ई-लिलावाचा पुढील भाग अर्थात 5 वा ई-लिलाव 09.03.2023 रोजी भारतीय अन्न महामंडळाने आयोजित केला होता. भारतीय अन्न महामंडळाच्या 23 विभागातील 657 डेपोमधून एकूण 11.88 लाख मेट्रिक टन गहू देऊ करण्यात आला आणि 1248 बोलीदारांना सुमारे 5.39 लाख मेट्रिक टन गहू विकला गेला.
5 व्या ई-लिलावात, अखिल भारतीय भारित सरासरी राखीव किंमत 2140.28 रुपये प्रति क्विटलच्या तुलनेत सरासरी विक्री किंमत 2197.91रुपये प्रति क्विंटल इतकी मिळाली.
5 व्या ई लिलावामध्ये 100 ते 499 एमटी पर्यंत जास्तीत जास्त मागणी होती, त्यानंतर 500-999 MT आणि त्यानंतर 50-100 MT गव्हाला मागणी होती.
4थ्या ई-लिलावापर्यंत 23.47 लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा विकला गेला असून 08.03.2023 पर्यंत 19.51 लाख मेट्रिक टन गव्हाची उचल करण्यात आली आहे.
5व्या ई-लिलावानंतर, खुल्या बाजारात विक्री (देशांतर्गत) योजने अंतर्गत गव्हाची एकत्रित विक्री 45 लाख मेट्रिक टनाच्या एकूण वाटपाच्या तुलनेत 28.86 लाख मेट्रिक टन वर पोहोचली आहे. संपूर्ण देशात गहू आणि आट्याच्या किमती कमी करण्यासाठी या विक्रीचा महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. हे दर खुल्या बाजारात विक्री (देशांतर्गत) योजने अंतर्गत गव्हाच्या खुल्या विक्रीसाठी भविष्यातील निविदांसह स्थिर राहण्याची शक्यता आहे.
पुढील ई-लिलाव 15.03.2023 रोजी आयोजित केला जाईल. 01.04.2023 पासून गहू खरेदी कालावधी सुरू होत असल्यामुळे सरकारने 31.03.2023 पर्यंत गहू उचल पूर्ण करण्यासाठी परवानगी दिली आहे.