मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे. मात्र विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्त्वाचा आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार जयंत आजगावकर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, संस्थेचे विजय वैद्य,प्रा.बी.आर.शर्मा हे उपस्थित होते.
यावेळी विज्ञान व उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सन २०२१ च्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्हिडीओद्वारे आभारपर मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ कोल्हापूर व तालसंदे आकुर्डी पुणेचे कुलगुरू डॉ.संजय पाटील, नवी दिल्ली एआयसीटीई या संस्थेचे सदस्य डॉ.देविप्रसाद शर्मा, कोलकाता येथील एनटीटीआर या संस्थेचे संचालक प्रा.राजीव कुमार, कानपूर येथील एचव्हीटीयू विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ.ओमकार सिंग, म्हैसूर येथील व्हीजेटीआर येथील शास्त्रज्ञ डॉ.फारूक काझी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी देशातील उत्कृष्ट कुलगरु तसेच इंजिनीयरींग महाविद्यालयांच्या प्राचार्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, तंत्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे. आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी आपल्याला निसर्गातून अनेक गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. आपल्याकडे तंत्रज्ञानातील अनेक विद्वान लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या राज्याला नक्कीच पुढे नेवूया. राज्यात नव्याने होणारे कला विद्यापीठ ही काळाची गरज आहे. आगामी काळातील कला विद्यापीठ राज्याच्या विकासात नक्कीच भर घालणारे आहे, असे मतही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री म्हणाले, जैव विविधतेचे जतन, संवर्धन आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या पिकांपासून आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. आपल्या देशातही ज्ञानवंत आहेत. त्यांनाही योग्य अशा गोष्टी उपलब्ध करून द्याव्या लागतील. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयएसटीईचे नेतृत्व कोल्हापुराकडे आहे. ज्या भूमीत छत्रपती शाहू महाराजांनी समानता, सक्षमतेचा आणि शिक्षणाचा पाया रचला,त्या भूमीकडे हे नेतृत्व आहे, ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हत्तीशी संवाद साधणाऱ्या श्री.आनंद शिंदे दांम्पत्यांची कालच भेट झाल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आपल्याला सृष्टीतील प्रत्येक गोष्टींशी संवाद साधता आला पाहिजे. श्री.शिंदे यांनी माहिती दिल्यानुसार हत्तींना त्सुनामीची चाहूल लागते आणि तीही दोनशे-अडीचशे किलोमीटर्सवर अंतरावर. त्यांच्याकडे कुठले तंत्रज्ञान आहे. हत्तीने पाय आपटला तर त्याच्या कंपनातून सात किलोमीटर्सवरील हत्तीला संदेश मिळतो. त्यामुळे आपण निसर्गाच्या पुढे पोहोचलो, असे कसे म्हणायचे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले,आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ लोकांना भेटता आले हे मी भाग्य समजतो. अनेक नव्याने तंत्रशिक्षण क्षेत्रातील संस्था उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रही उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे. राज्यात जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे कला विद्यापीठ म्हणून येत्या काही महिन्यातच नावारूपास येणार आहे. तसेच राज्यात शासकीय संगीत महाविद्यालय उभे राहत आहे ही राज्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तसेच राज्यात राबविण्यात येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाचा पहिला भागही आगामी मंत्रीमंडळासमोर सादर होणार आहे, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.
राज्यमंत्री गृह (शहरे) सतेज पाटील म्हणाले, देशातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था, नवी दिल्ली ही संस्था कार्यरत आहे. विशेषतः संस्थेचे अध्यक्ष प्रताप देसाई हे शिक्षणाचा दर्जा जपला जावा यासाठी अत्यंत चांगलं काम करीत आहेत. सरकार बरोबर योग्यपणे समन्वय ठेवून शिक्षण क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. राज्यातही नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात एक आदर्श असे हे नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राबवेल, अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी केले. प्रा.महेश काकडे यांनी सूत्रसंचालन तर आभार श्री.कटके यांनी मानले.
Related Posts
-
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - अखिल भारतीय किसान…
-
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्याचे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - अखिल भारतीय…
-
मुख्यमंत्री यांच्या घरावर बिराड आंदोलनाचा अखिल भारतीय आदिवासी सेनेचा इशारा
https://youtu.be/-xm7AhvNkiE धुळे/प्रतिनिधी -दादर मध्य रेल्वे स्टेशनच १६ डिसेंबर पर्यंत डॉ.…
-
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात
नाशिक/प्रतिनिधी- कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात…
-
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती निवड चाचणीत एसटी महाविद्यालयाच्या खेळाडूंचे वर्चस्व
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात…
-
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको
सोलापूर/अशोक कांबळे - स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय…
-
नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या पहिल्या वारसा महोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण मंत्री राजनाथ…
-
नवी मुंबईत भारतीय मानक ब्यूरोचे छापे, मोठ्या प्रमाणात बनावट खेळणी जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - खेळण्याच्या निर्मितीत गुणवत्ता…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
भारतीय रेल्वेचे “ट्रेन्स ऍट ए ग्लान्स नावाचे अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वे मंत्रालयाने 1…
-
भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची भरती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
भारतीय डाक विभागमध्ये पद भरती
पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा) पात्रता : जड…
-
भारतीय निवडणूक आयोगाने 'टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचा केला सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या…
-
नवी दिल्लीतून जनऔषधी रेल्वे रवाना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जनौषधीचा प्रसार करण्यासाठी…
-
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन
संभाजी नगर/प्रतिनिधी -संपूर्ण महाराष्ट्रा नव्हे तर संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
नवी मुंबईत दीड दिवसीय बाप्पाला उत्साहात निरोप
नेशन न्यूज मराठी टीम.च नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या…
-
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) - ११ जागा मॅनेजर (टेक्निकल) - २…
-
भारतीय रेल्वेचे परिविक्षाधीन अधिकारी राष्ट्रपतींच्या भेटीला
नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय रेल्वेच्या (2018 तुकडी) 255…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
थॉमस कप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस…
-
मुंबईत भारतीय हवाई दलाची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी- भारतीय हवाई दलाने 14…
-
भारतीय वायुदलाचा ब्राईट स्टार-23 युद्धसरावात सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - इजिप्तच्या…
-
भारतीय तटरक्षक दलाकडून ३२ बांगलादेशी मच्छिमारांची सुटका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक दलाने …
-
नवी दिल्लीत दुर्मिळ खनिजे परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुर्मिळ खनिजे…
-
पूर्व किनारपट्टीवर भारतीय नौदलाचा पूर्वी लहर युद्धसराव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाने…
-
जपानच्या अभ्यासगटाची नवी मुंबईतील पर्यावरणशील प्रकल्पांना भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आधुनिक…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
भारतीय रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लाखो भारतीय…
-
रशिया व्होस्टोक-२०२२ युद्धसरावात भारतीय सैन्य दलाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 01 ते 07…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थितीत बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सर्वत्र…
-
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय लोक प्रशासन संस्था,…
-
भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकेचे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय शुक्रवारी सोलापूर विद्यापीठात
सोलापूर - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 'उच्च…
-
नवी मुंबईतील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये तात्पुरते कोव्हीड रुग्णालय
प्रतिनिधी. नवी मुंबई - वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये करोना…
-
रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेमल चक्रीवादळाचा…
-
भारतीय तटरक्षक दलाकडून ‘ऑपरेशन सजग’ चा सराव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - 'ऑपरेशन…
-
भारतीय रिझर्व्ह बँकेत ३२२ जागांसाठी भरती
ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा शैक्षणिक…
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
भारतीय मुलींनी युरोपियन ऑलिम्पियाडमध्ये रचला इतिहास
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मुलींनी गणित…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडाच्या बाजारपेठेत विक्रीला जाणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतात उत्पादित केळी आणि…
-
भारतीय लष्कराचा अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी अकरा बँकाबरोबर करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराने नोंदणीकृत…
-
या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा…
-
भारतीय नौदलाची चौथ्या सागर परिक्रमेची वेगवान तयारी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…