नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – ठाणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2023-24 च्या एकूण 478.63 कोटी चा नियतव्ययाच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सर्व यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री महोदयांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, आमदार सर्वश्री किसन कथोरे, राजू पाटील, गणपत गायकवाड, कुमार अयलानी, रईस शेख, निरंजन डावखरे, संजय केळकर, रमेश पाटील, डॉ. बालाजी किणीकर, शांताराम मोरे, महेश चौघुले, दौलत दरोडा, श्रीमती गीता जैन आदी उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी सन 2022-23 या वर्षाच्या जिल्हा नियोजन निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. सन 2022-23 या वर्षात जिल्ह्याला 618 कोटींचा नियातव्यय मंजूर करण्यात आला होता. त्यातील प्राप्त निधीपैकी 48 टक्के निधी खर्च झाला आहे. मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यास राज्य शासनाने सन 2023-24 साठी 478 कोटी 63 लाखांचा नियतव्य कळविला होता. त्यानुसार आजच्या बैठकीत या नियतव्ययास मंजुरी देण्यात आली. राज्यस्तरीय बैठकीत हा निधी वाढवून 902 कोटी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेकरिता सन 2023-24 साठी शासनाने एकूण 73.44 कोटी नियतव्यय कळविला आहे. त्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली. आदिवासी उपयोजनेसाठी सन 2022-23 या वर्षात प्राप्त निधी पैकी 39.09% खर्च झालेला आहे. अनुसुचित जाती उपाययोजना (विशेष घटक योजना) सन 2023-24 करिता शासनाने एकूण 72.00 कोटी नियतव्यय कळविला आहे. सन 2022-23 या वर्षाचा प्राप्त निधी 25.20 कोटी रुपये (35%) निधी प्राप्त असून 2.29 कोटी रु. चे प्रस्ताव प्रशासकिय मान्यतेस्तव सादर करण्यात आलेले आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील सूचनांची अमंलबजावणी करावी – पालकमंत्री
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. श्री. देसाई म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा विनियोग करताना लोकप्रतिनिधींकडून कामांची यादी घ्यावी व त्यांनी सुचविलेली कामे प्रस्तावित करावीत. सर्व यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल, याकडे लक्ष द्यावे. ज्याचा निधी खर्च होणार नाही, त्यांच्यावर विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी यंत्रणांनी काटेकोरपणे करावी. राज्यस्तरीय प्रश्नांवर मंत्रालयात बैठक घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी व आदर्श शाळा उपक्रम राबविणार
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे चांगली रहावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शाळा व आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा उपक्रम राबविणण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 14 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 103 शाळांची निवड या योजनेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिली.
गेल्या नऊ वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीचा एकूण 99 टक्केहून अधिक निधी खर्च होत असून यावर्षीही शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा सांख्यिकी पुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
यावेळी ठाणे जिल्ह्याचे श्री. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार किसन कथोरे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. त्याला डॉ. बालाजी किणीकर यांनी अनुमोदन दिले. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अन्न व पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कडधान्याचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या सांख्यिकी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. कृषी विभागाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना व प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती देणाऱ्या चित्ररथास पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी प्रास्ताविकात जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त सदानंद दाते, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
ठाणे जिल्हापरिषदेच्या रानभाज्या महोत्सवाला उत्सुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/6VrM-HnBcUQ?si=kQT25yXzj9oBVk9C ठाणे/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्हा…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककाळात मनाई आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ…
-
ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याबाबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
ठाणे जिल्ह्याला खराब कंत्राटदारांचा शाप - केंद्रीय मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - केवळ एक नाही तर…
-
नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ,पोलिसांनी सुरु केलं 'माझे ठाणे सुरक्षित ठाणे' ऍप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या…
-
ठाणे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील…
-
ठाणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या वर्षीच्या…
-
ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदांच्या कौशल्यातून निर्मित वस्तूचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीएसटी विरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
ठाणे परिवहन सेवेच्या १०बसेस कोरोना संकटकाळात रुग्णवाहिकेची देणार सेवा
प्रतिनिधी . ठाणे - कोव्हीड 19 रूग्णांची वाढती संख्या…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
ठाणे जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्हयातील सर्व तालुका…
-
ठाणे जिल्हा प्रशासन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब,…
-
ठाणे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यावे - कृषीमंत्री दादाजी भुसे
प्रतिनिधी . ठाणे - कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे मतदारसंघ शिवसेना, भाजपचा…
-
भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक,ठाणे वनविभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. शहापूर - भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तीन…
-
ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय…
-
ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती
१. पदाचे नाव : आरोग्य निरीक्षक - ५० जागाशैक्षणिक पात्रता…
-
ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पाचव्या टप्यातील उमेदवारी…
-
ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आवाहन
https://youtu.be/95yCH1BvJWs
-
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद…
-
ग्रुप कॅप्टन सुशांत बिस्वास यांनी ठाणे येथील भारतीय वायुदलाच्या स्थानकाचा स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. ठाणे- ग्रुप कॅप्टन सुशांत बिस्वास व्हीएसएम…
-
मुंबई शहर जिल्ह्याच्या २४० कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या…
-
ठाणे जिल्ह्यातील आजअखेर पर्यत ५६ हजार मजुर मूळगावी रवाना
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान,…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन…
-
ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशात ज्याप्रमाणे…
-
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने ठाणे मिलेट महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष…
-
वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी रमेश घेगडे पाटील यांची निवड
प्रतिनिधी. शहापूर - वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
ठाणे जिल्हाचा बारावीचा निकाल ९२.६७ टक्के
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…