नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
सोलापूर/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी देशी पिस्टलसह ४ जणांना अटक केली आहे. आरोपींनी देशी बनावटीचे पिस्टल मध्यप्रदेशच्या सीमेवरील उमर्टी गावातून खरेदी केले होते. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी परिसरातील सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेला याची गुप्त माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. तसेच सहा गावठी पिस्टलसह, ३५ जिवंत काडतुस जप्त केले. विशेष बाब म्हणजे ४ आरोपींपैकी १ आरोपी हा पेशाने इंजिनीयर आहे. या घटनेतील आरोपी सोलापूरमधील माढा तालुक्यातील आहेत. अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.