नेशन न्यूज मराठी टीम.
गोंदिया/प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यामध्ये धरणसाठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरण नियंत्रणाकरिता धरणाचे 04 गेट 0.30 मी.ने उघडण्यात आले आहे.
तर कलिसरार धरणाचे 2 गेट उघडण्यात आले आहे. त्यामधून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य आहे नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये. जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये. जलाशयात येणारा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे. असे निर्देश प्रशासनाद्वारा देण्यात आले आहेत.