नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
पुणे/प्रतिनिधी – आर्मी एव्हिएशन कोअर एक निर्णायक, चहूबाजूने हालचाल करण्याची क्षमता असलेल्या शाखेमध्ये विकसित झाली आहे, ज्यामुळे फील्ड फोर्स कमांडर्सना एक निश्चित लढाऊ शक्ति प्राप्त झाली आहे. या शाखेचा झपाट्याने विस्तार झाला असून आता आधुनिक युद्धभूमीवर सर्व परिस्थितींमध्ये निर्णायक भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वसामान्यांना मदत करण्यातही ही शाखा आघाडीवर आहे.
कोअरने आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत गुणात्मक आणि परिमाणात्मक वाढ अनुभवली आहे तसेच सर्व क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक ठिकाणी पुरस्कार मिळविले आहेत. आर्ट रोटरी आणि फिक्स्ड विंग (UAVs) प्लॅटफॉर्मच्या ऑपरेशनच्या भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी देखील ही शाखा सज्ज आहे. 01 नोव्हेंबर 2022 रोजी कॉर्प्सच्या 37 व्या स्थापना दिनानिमित्त, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, साउदर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी ‘स्विफ्ट अँड शुअर’ हे त्यांचे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात साध्य करणाऱ्या आर्मी एव्हिएशन कोअरच्या सर्व श्रेणींचे कौतुक केले. तसेच त्यांना त्याच उत्साहाने आणि स्फूर्तीने पुढे जाण्याचे आवाहन केले.