Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या व्यापारातून ३५० कोटीची उलाढाल

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/Mve9JInzajw?si=qm8DzvYX5J9as1JK

नंदुरबार/प्रतिनिधी – फळे, भाज्या येण्याचा एक विशिष्ठ हंगाम असतो. पण मिरची ही एकमेव आहे जी वर्षभर बाजारात विकली जाते. मिरची जेवणाची चव वाढवते. त्यामुळे विविध पद्धतीने तिचा जेवणात वापर केला जातो. म्हणूनच की काय यंदा नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक वाढल्याचे चित्र आहे.

नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीने विक्रमी आवक केली आहे. गेल्या 10 ते 15 वर्षातील ही आवक सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. नंदुरबारचे मिरची मार्केट हे महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश राज्यात देखील प्रसिद्ध आहे. मिरचीच्या या आवकमुळे जवळपास 350 कोटी रुपयांची उलाढाल बाजार समितीत झाली आहे.

दरवर्षी बाजार समितीमार्फत 40 ते 50 मिरची पथाऱ्या उभारण्यात येत होत्या, परंतु यावर्षी 70 ते 80 मिरची पथाऱ्या उभारण्यात आल्या आहेत. जवळपास रोज 700 ते 800 वाहनातून मिरची विक्री होत होती आता मिरची हंगाम अंतिम टप्प्यात आला असून एप्रिल पर्यंत हंगाम संपत असतो. परंतु आता देखील 80 ते 100 वाहनातून जवळपास 1000 ते 1500 क्विंटल मिरचीची विक्री बाजार समितीत होत आहे. त्यामुळे मिरचीचे मार्केट तेजीत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना कापूस व पपई या पिकांपासून पुरेसा भाव न मिळाल्याने नुकसान झाले होते. त्यामुळे येत्या हंगामात शेतकरी मिरची उत्पादनाकडे वळतील. तसेच यामुळे जवळपास दीडपट मिरची लागवडीचे क्षेत्र वाढेल अंदाज बाजार समितीकडून वर्तवण्यात आला आहे.

Translate »
X