महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image क्रिडा ताज्या घडामोडी

राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेत १४ राज्यातील ३३ संघांचा समावेश

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – १२ वी राष्ट्रीय पेसापालो स्पर्धा आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल मोहिली-अघई  येथे २२ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान सुरु राहील. या स्पर्धेत राजस्थान, केरळ, छत्तीसगड, मुंबई, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, मध्य-प्रदेश दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरियाणा, आसाम, महाराष्ट्र या राज्यांतून पुरुष, महिला व मुलामुलींची संघ सहभागी झाले आहेत. 
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आत्मा मालिक संकुलाचे कार्याध्यक्ष  उमेश जाधव, चेतन  पागावाड, सचिव, पेसापालो फेडरेशन ऑफ इंडिया,  दिनेश कुमार, सचिव राजस्थान,   मारुती मरक्कम, सचिव छत्तीसगड, पद्मकुमार, सचिव केरळ, घनश्याम शिंदे, तांत्रिकी समिती प्रमुख, सुनील क्रॉडसर्स पंचप्रमुख उपस्थित होते. तसेच आत्मा मालिक संकुलाचे स्पोर्ट टीचर  शशिकला खडताळे,  आर भास्करन हेही उपस्थित होते.
 शनिवारी झालेल्या पुरुष गटातील महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड स्पर्धेत महाराष्ट्राने १२ गुण आणि छत्तीसगड ने १ गुण  बनविले. महाराष्ट्राकडून अंकित परब, ऋषीराज गोळे, विनोद सिंग, मुन्ना सिंग आणि छत्तीसगड तर्फे अवनीत टिग्गा, शेखर ज्वालाप्रताप यांनी आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
 महिला गटात महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड या सामन्या मध्ये महाराष्ट्र संघातर्फे रसिका संकपाल, दिव्या देवरे, तेजल शेलार आणि छत्तीसगड संघातर्फे सपना चंद्रकार, अनुप्रिया टिरकी, सैजल केरकट्टा यांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले.
राजस्थान विरुद्ध महाराष्ट्र पुरुष गटामध्ये राजस्थान तर्फे करन सैनी, विष्णू सैनी, रोहिदास सैनी आणि महाराष्ट्र तर्फे एलेक्स चेट्टी, डॅनियल पेरुम्मली, श्याम चौधरी व आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे विश्वजीत कवटे, पंकज शिबडे व ऋतिक कुराडे यांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले.
पेसापालो हा खेळ फिनलँड या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे व हा खेळ भारता मध्ये २०१२ पासून विविध राज्यांमध्ये खेळला जातो. २०१९ मध्ये याची विश्व स्पर्धा पुणे-महाराष्ट्र येथे संपन्न झाली व त्या स्पर्धेमध्ये भारताचा ४था क्रमांक आला होता व या खेळाचे इंटरनॅशनल ऑलम्पिक १९५२ मध्ये प्रात्यक्षिक दाखविले आहे. या खेळाचा स्कूलगेम फेडरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रात्यक्षिक झालेले आहे व हा खेळ लवकरच शालेय स्तरावर याचा समावेश होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×