नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – खेलो इंडिया योजनेच्या “क्रीडा स्पर्धा आणि कौशल्य विकास” या घटका अंतर्गत, खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा/ खुल्या निवड चाचण्यांमधील कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची खेलो इंडिया क्रीडापटू म्हणून निवड केली जाते. त्यानंतर, भारतीय क्रीडा प्राधिकरण , राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध पोर्टलच्या माध्यमातून, देशात सुप्त गुणवत्ता असलेल्या आणि वरचढ असलेल्या प्राधान्य क्रीडा प्रकारांमधील प्रतिभावान खेळाडू ओळखण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. ओळखल्या गेलेल्या खेळाडूंच्या कौशल्य आणि गुणवत्तेची जोपासना करण्यासाठी त्यांना विविध प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विकसित होण्यासाठी आणि राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
आतापर्यंत, खेलो इंडिया योजने अंतर्गत 21 क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातून 2841 खेळाडूंची खेलो इंडिया क्रीडापटू म्हणून निवड झाली आहे.
- खेलो इंडिया क्रीडापटूंची निवड, खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा/राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा/खुल्या निवड चाचण्यांमधील कामगिरीच्या आधारावर केली जाते.
- साई, अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) नॅशनल स्पोर्ट्स टॅलेंट सर्च (राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध) पोर्टलद्वारे प्राधान्य क्रीडा प्रकारांमधील प्रतिभावान खेळाडूंना ओळखण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते.
- केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामधून ही माहिती दिली.