नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – अहमदनगर लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. अहमदनगर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघ विभागाला आहे दक्षिण आणि उत्तर नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहे. अहमदनगर मतदारसंघात लोकसभा निवडणूक 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणार आहे.
लोकसभा मतदारसंघांसाठी ४२ उमेदवारांचे ५५ नामनिर्देशन पत्र दि. २५ एप्रिल पर्यंत प्राप्त झाले होते. दुसऱ्या दिवशीच्या छाननीत ३६ उमेदवार वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार जाहिर करण्यात आले होते. त्यानंतर दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत ११ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने २५ उमेदवार हे निवडणूक लढविण्यासाठी अंतिम करण्यात आले व त्यांना दुपारी ३.०० नंतर लगेच चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणूक लढविणा-या २५ उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.