नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढला असून उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे महत्वाचे काम असल्यास घराबाहेर पडण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. राज्यात अनेक जण उष्माघाताला बळी पडले आहेत. म्हणूनच नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी येथे एका मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली होती. मात्र त्या रुग्णाचा मृत्यू उष्माघाताने नव्हे तर हृदयविकाराने झाले असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 24 उष्माघाताचे रुग्ण आढळून आले. मात्र आता या रुग्णांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी महत्त्वाचे कामे सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत पूर्ण करावी. महत्वाचे कामे असल्यास रुमाल, छत्री सोबत ठेवावे. तसेच सतत पाणी पिण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी नागरिकांना केले आहे.