महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

कोणार्क एक्स्प्रेस मध्ये आढळले २१ किलो अमली पदार्थ,कल्याण आरपीएफची कारवाई

कल्याण/संघर्ष गांगुर्डे– कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या कोणार्क एक्सप्रेस च्या डी 2 बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून 2 लाख 7 हजार रुपये किमतीचा 21 किलो अमली पदार्थ कल्याण आरपीएफ ने जप्त केला आहे .हे अमली पदार्थ ( गांजा) नारकोटिक्स विभागाला सुपूर्द  करण्यात आला असून  हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे याचा तपास सुरू आहे

शुक्रवारी पहाटे 2 वाजून 30 मिनिटाच्या वाजण्याच्या सुमारास उडीसाहून  कल्याण स्थानकात येत असलेल्या कोणार्क एक्सप्रेस च्या डी 2 बोगीतील एका सीट खाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली होती .या माहितीची शहानिशा करण्यासाठी आरपीएफ ला सूचना देण्यात आल्या .घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कल्याण आरपीएफचे स्टेशन प्रभारी भुपेंद्र सिंह आणि त्यांच्या टीमने  कोणार्क एक्सप्रेस रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील 7 नंबर फलाटावर दाखल होताच आर पी एफ मे सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेस ची संपूर्ण बोगी  रिकामी करत तपासणी केली असता सीट खाली लाल रंगाची ट्रॉली बॅग आणि काळ्या रंगाची सॅग बॅग आढळून आली. आरपीएफ कल्याणचे एएस आय राजकुमार भारती यांच्यासह कल्याण स्टेशनचे आरक्षक एस एन मुंडे यांच्या टीमने या बॅगेची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात हिरव्या रंगाचे गवतासारखे दिसणारा 20 किलो 780 ग्राम वजनाचा अमली पदार्थ ( गांजा) असल्याचे आढळून आले याची किमंत 2 लाख 7 हजार 800 इतकी असल्याचे आरपीएफ कडून सांगण्यात आले .हा गांजा नारकोटिक्स विभागाला सुपूर्द  करण्यात आला हा गांजा कोणी आणि कुठून  आणला आहे याचा तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×