महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी देश

महाराष्ट्रातील तीन विमानतळासह देशभरात २१ ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार

नेशन न्युज मराठी टिम.

नवी दिल्‍ली – महाराष्ट्रातील नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि  शिर्डी, गोव्यात मोपा,कर्नाटकातील विजापूर, हसन, कलबुर्गी आणि शिमोगा, मध्य प्रदेशातील डबरा (ग्वाल्हेर) उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि जेवार (नोएडा), गुजरातमधील ढोलेरा आणि हिरासर, पुद्दुचेरीतील कराईकल, आंध्र प्रदेशातील दगदार्थी, भोगापुरम आणि ओरवाकल (कुर्नूल), पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पाकयोंग, केरळमधील कन्नूर आणि अरुणाचल प्रदेशातील होलोंगी (कुर्नूल). इटानगर) या देशातील २१ ग्रीनफिल्ड विमानतळांच्या उभारणीसाठी भारत सरकारने ‘तत्त्वतः’ मान्यता दिली आहे.  . यापैकी  पश्चिम बंगालमधील दुर्गापूर विमानतळ, महाराष्ट्रातील शिर्डी आणि  सिंधुदुर्ग विमानतळ, केरळमधील कन्नूर विमानतळ, सिक्कीममधील पाकयोंग विमानतळ, कर्नाटकातील कलबुर्गी विमानतळ, आंध्र प्रदेशमधील ओरवाकल (कुर्नूल) विमानतळ  आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगर असे 8 ग्रीनफिल्ड विमानतळ विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई दळणवळणाला  चालना देण्यासाठी आणि   परवडणारी हवाई वाहतूक जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी  ऑक्टोबर, 2016 मध्ये प्रादेशिक हवाई दळणवळण  योजना (RCS) – UDAN (उडान  -उडे देश का आम नागरिक) सुरू केली. या योजनेंतर्गत विमानतळांचा विस्तार/विकास ‘मागणीवर आधारित’ असून विविध सवलती पुरवण्यासाठी राज्य सरकार तसेच  विमानकंपनी चालकांच्या प्रतिबद्धतेवर  अवलंबून आहे.

उडानअंतर्गत बोलींच्या  चार फेऱ्यांच्या आधारे, उत्तर प्रदेशसह देशभरात विविध ठिकाणी 14 जल विमानतळ  आणि 36 हेलिपॅडसह 154 विमानतळ निश्चित करण्यात आले आहेत.  14.03.2022 पर्यंत, 8 हेलीपोर्ट्स आणि 2 जल विमानतळांसह  66 सेवेत नसलेल्या  आणि सेवेत कमी असलेले  विमानतळ कार्यान्वित केले गेले आहेत. कार्यान्वित करण्यात आलेल्या   66 विमानतळ/हेलिपोर्ट/जल विमानतळांची  यादी जोडली आहे.

परिशिष्ट

उडान  योजनेअंतर्गत कार्यान्वित केलेल्या 66 विमानतळ/हेलिपोर्ट/जल विमानतळांची यादी

S No.StateAirport
 Andhra PradeshKadapa     
  Kurnool Airport
 AssamJorhat      
  Lilabari      
  Tezpur      
  Rupsi
 Arunachal PradeshTezu
  Passighat
 BiharDarbhanga  
 ChhattisgarhJagdalpur  
  Bilaspur   
 Daman & DiuDiu     
 GujaratBhavnagar     
  Jamnagar     
  Kandla  
  Mundra  
  Porbandar     
  Statue of Unity (W)     
  Sabarmati River Front  (W)     
 HaryanaHissar    
 Himachal PradeshShimla  
  Kullu       
  Mandi (H)    
  Rampur (H)    
 KarnatakaBelgaum       
  Hubli      
  Mysore  
  Vidyanagar  
  Kalaburgi (Gulbarga)    
  Bidar  
 KeralaKannur   
 Madhya PradeshGwalior     
 MaharashtraGondia
  Jalgaon  
  Kolhapur  
  Nanded  
  Ozar (Nasik)  
  Sindhudurg
 MeghalayaShillong     
 NagalandDimapur       
 OdishaJharsuguda  
 Pondicherry (UT)Pondicherry     
 PunjabAdampur  
  Bhatinda  
  Ludhiana  
  Pathankot  
 RajasthanBikaner  
  Jaisalmer  
  Kishangarh   
 SikkimPakyong   
 Tamil NaduSalem  
 Uttar PradeshAgra     
  Allahabad      
  Kanpur(Chakeri)  
  Hindon   
  Bareilly
  Kushinagar
 UttarakhandPantnagar     
  Pithoragarh   
  Sahastradhara (H)   
  Chinyalisaur (H)   
  Gaucher (H)   
  New Tehri (H)   
  Srinagar  (H)
  Haldwani (H)
 West BengalDurgapur    

W- Water Aerodrome ; H – Heliport

नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×