नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मानवतेच्या सेवेमध्ये संलग्न असलेल्या संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, वाशी येथे आयोजित मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात 200 नागरिक लाभान्वित झाले.
या शिबिरामध्ये 14 रुग्णांना मोतीबिंदु असल्याचे आढळून आले व त्यांना के.बी. हाजी बच्चुअली चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई येथे त्यांच्या शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आले. 97 रुग्णांना चश्म्याचे नंबर काढून त्यांना चश्मे वाटण्यात आले. उर्वरित रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करुन त्यांना डोळे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक सल्ल्याबरोबर औषधांचेही वाटप करण्यात आले. या शिबिरात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड आणि आर.ए.पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेल, वरळी, मुंबई येथील नेत्र चिकित्सकांनी आपल्या निष्काम सेवा बहाल केल्या.
या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार संजीव नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक करताना म्हटले, की या मिशनचे कार्य फार मोठे आहे आणि मला या उपक्रमांमध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळते याचा मला फार आनंद होतो.संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या प्रेमा ओबेरॉय यांच्या देखरेखीखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक मनोहर सावंत आणि स्थानिक मुखी अनिल शिंदे यांनी स्थानिक सेवादल यूनिटच्या सहकार्याने महत्वपूर्ण योगदान दिले.