नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी– 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाच्या SST पथकाने काल रु. 2,08,370/- इतकी संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. सदर SST पथकाची उसाटणे नाक्यावरील नवी मुंबई कडून कल्याणच्या दिशेने येणा-या वाहनांची तपासणी करुन, त्यामध्ये आढळलेल्या बेकायदेशीर वस्तु जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत नेमणूक करण्यात आली होती.
दि. 09/05/2024 रोजी ऊसाटणे नाका या ठिकाणी नवी मुंबईकडून कल्याणच्या दिशेने येणा-या वाहनांची तपासणी करीत असताना दुपारच्या सुमारास नवी मुंबई कडून आलेल्या टाटा नेक्सॉन या गाडीची तपासणी करीत असताना, या गाडीमध्ये वाहनचालकाच्या बाजूच्या सीटवर 2 पिशव्या निदर्शनास आल्या. त्याबाबत संबंधित वाहनचालकास SST पथकाने विचारणा केली असता, संबंधित वाहनचालकाने या पिशव्यामध्ये रोख रक्कम असल्याबाबत सांगितले. परंतू सदर रोख रक्कमेबाबत संबंधित इसमास काहीही स्पष्टीकरण न देता आल्यामुळे तसेच रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर करता न आल्यामुळे 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाच्या SST पथकाने ती रक्कम ताब्यात घेवून, सदर रक्कमेचा पंचनामा केला. तथापि रात्रीच्या वेळी उपकोषागार कार्यालय बंद असल्यामुळे हिललाईन पोलीस स्टेशन येथे पोलीस ठाण्याच्या सिलने सदर लिफाफे सिलबंद करुन त्यावर पंचांच्या व पथकप्रमुखाच्या स्वाक्ष-या घेवून सिलबंद करण्याची कार्यवाही केली. सदर रक्कमेचे लिफाफे काल रात्री हिललाईन पोलीस स्टेशनच्या स्ट्राँगरुम मध्ये जमा करण्यात आले.
आज दि. 10/05/2024 रोजी सदर लिफाफे हिललाईन पोलीस स्टेशनकडून संकलीत करुन ते एका स्टिलच्या पेटीत कुलूप बंद करुन कल्याण कोषागारात सिलबंद करुन त्यांचे स्ट्राँगरुममध्ये ठेवून पोहोच घेण्यात आली आहे,अशी माहिती 142- कल्याण (पूर्व) विधान सभा मतदारसंघातील SST-6 चे पथक प्रमुख राहुल गायकवाड यांनी दिली आहे.