कल्याण/प्रतिनिधी – कल्याण, मुंब्रा, भिवंडी परिसरात मुस्लीम बहुल भाग असल्याने बकरी ईदच्या निमित्ताने कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बैल बाजारात बकर्याचा बाजार फुलला आहे. या बाजारात राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात मधून १७ हजार बकऱ्यांची आवक झाली असून मागील चार दिवसापासून ग्राहकाचा फारसा प्रतिसाद नव्हता मात्र आजपासून ग्राहकाची संख्या वाढू लागली आहे .गेल्यावर्षी करोना लॉकडाऊन मुळे बाजार समिती मधील बैल बाजार बंद ठेवण्यात आला होता तर राज्याच्या सीमा देखील बंद करण्यात आल्याने ईदसाठी बकरे मिळणे कठीण झाले होते. मात्र यंदा शासनाने सीमा सुरु केल्या असून निर्बंध बरेचसे शिथिल केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील देवनार येथील बकऱ्यांचा बाजार देखील बंद करण्यात आल्याने सहाजिकच कल्याण मध्ये बकऱ्यांचे आवक वाढली आहे गेल्या वर्षी १२८०० बकऱ्यांच्या आवक झाली होती यावर्षी मात्र १७ हजार बकऱ्यांची आवक झाली आहे.
- July 19, 2021