नेशन न्यूज मराठी टीम.
शहापुर/प्रतिनिधी – शहापुर तालुक्यात समृद्धी महामार्ग सरलांबे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे समृद्धीचे गर्डर कोसळून १७ जण ठार तीन जखमी.टीडीआरएफ़ टिम शहापुर घटनास्थळी पोहचुन रेस्क्यू करण्यास सुरूवात.
शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन व गर्डर कोसळले. या घटनेत आतापर्यंत १७ मजूर मयत झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम व अग्निशमन सह इतर टीम उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व महसूल प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहेत.रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दुर्घटनेच्या निमित्ताने नागरिकांच्या मनात आनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे समृद्धी महामार्ग हा जर सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तर प्रत्येक वेळी एवढ्या मोठ्या दुर्घटना कशा होतात? त्याचा साठी पुरेपूर काळजी का घेतली जात नाही? किवा सरकारने ज्या यंत्रांना समृद्धी महामार्गाचे काम दिलेआहे त्या तेवढ्या सक्षम आहेत का? असे ना ना प्रकारचे प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे. कारण दुर्घटना आणि सततचे अपघात कुटुंबचे कुटुंब उद्वस्त करीत आहे.
सरकारने जरी मृताच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली असली तरी माणसाच्या जीवनाचे मोल एवढे कमी असू शकते का? त्याच बरोबर जर यंत्रणांनी पुरेपूर काळजी घेतली असती तर आज १७ कुटुंब उघड्यावर पडले नसते.
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, असे ठणकावत सांगणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे.आणि त्याच दिवशी कष्टकरी श्रमिकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी घेला हि बाब खूप लाजिरवाणी आहे.