नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – राज्य सरकारी कर्मचारी व निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असे 17 लाख कर्मचारी 14 डिसेंबरपासून मुदत संपावर जाणार आहे. मार्च 2023 मध्ये संप आंदोलन छेडलं होतं या संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या प्रमुख आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी प्रधान मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासनं दिली. आम्ही ते मान्य केले व संप मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. 17 मागण्यांसंदर्भात मुख्य सचिव पातळीवर चर्चा करून त्या त्या विभागातर्फे मार्ग काढला जाईल परंतु गेल्या सहा महिन्यापासून या निवृत्ती वेतन संबंधांमध्ये जुन्या पेन्शन संबंधांमध्ये समिती नेमली होती त्या समिती ने तीन महिन्यात काहीही हालचाल केलेली नाही. कोणताही अहवाल पूर्ण होऊ शकला नाही.
त्याचप्रमाणे इतर सगळ्या मागण्यांसंदर्भात देखील कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली दिसून आलेली नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचारी संतप्त झाले. त्यात पूर्ण राज्यातील समन्वय समितीची ऑक्टोबरमध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये चर्चा होऊन तालुकास्तरावर मोर्चे निघाले. तरी देखील मागण्यांची दखल घेतली गेली नाही. नाईलाजाने 17 लाख कर्मचाऱ्यांनी 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती यावेळी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीसांनी दिली आहे.