नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला असून राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे 95,380 व 59,012 अशा एकूण 1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.
यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या 83 असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.
उपलब्ध जागांपैकी 53600 जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी 20072, अनुसूचित जमातीसाठी 10808, इतर मागासवर्ग 29335, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 15439, विमुक्त जाती 4631, भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे 3859, 5404 व 3088 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. याचबरोबर अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी 2548, दिव्यांग उमेदवारांसाठी 7719 व खुल्या गटातील उमेदवारांसाठी 61756 जागा उपलब्ध आहेत.
2023 या वर्षापासून नव्याने 257 तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये 5140 एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने 30 तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.
वर्ष 2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून यातील प्रत्येकी एका तुकडी मध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा एकूण 12 संस्थांमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरुवात होणार आहे या व्यवसायाच्या माध्यमातून भारत ड्रोन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.दिगांबर दळवी यांनी दिली आहे.
Related Posts
-
शहापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत…
-
आम्हाला जागा उपलब्ध करून द्या,अन्यायकारक कारवाई थांबवा - खासगी बसमालकांची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर…
-
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर पर्येंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक,…
-
भायखळा आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु; २९ ट्रेडसाठी १५०० जागा उपलब्ध
मुंबई, दि. ९ : भायखळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) 29…
-
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून महिलांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण
प्रतिनिधी. ठाणे - जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी…
-
डोंबिवलीत मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मनसे पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ.…
-
डायमंड लीगपूर्वी फिनलंडच्या कुओर्टाने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रामध्ये नीरज चोप्रा प्रशिक्षण घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक…
-
महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे…
-
कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीचे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ,…
-
केडीएमसीच्या पाच माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/H-iBF6sCsgA मुंबई - कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
नागपुरात वंचितची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
तृतीयपंथीयांना समाजकल्याण विभागाकडून शेळीपालन प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी -तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी…
-
मलेशियातील पोर्ट क्लांग येथे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - आग्नेय आशियामध्ये…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर…
-
कारागृहांमध्ये बंदीजनांकरीता उपलब्ध होणार स्मार्टकार्ड फोन सुविधा
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
डोंबिवलीकरांचा पारंपारिक लेझिम प्रशिक्षण कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वात नावाजलेल्या आणि…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक…
-
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्साहात
मुरबाड/प्रतिनिधी - कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक…
-
सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय…
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…
-
मनसेला धक्का देत माजी नगरसेविकेसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मनसेला पुन्हा एकदा खिंडार…
-
कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपची जागा हॉस्पिटलसाठी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपच्या…
-
अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेमार्फत प्रशिक्षण शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेने आयोजित…
-
जळगावात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी -शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार…
-
हस्तकला कारागिरांना डिजीटल विपणन मंच उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - विकास आयुक्त (हस्तकला)…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील…
-
मासुंदा तलावात पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत…
-
डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर वाहतुकीला बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील…
-
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत…
-
२७ ऑगस्टपर्यंत आयटीआय प्रवेशासाठी मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरिता…
-
शासन शब्दकोश भाग-१ आता गुगल प्लेवर उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द…
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
नाशिकच्या जागा वाटपावर छगन भुजबळांचा खुलासा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
मुंब्रा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंब्रा येथील शासकीय तंत्रनिकेतन…
-
सागरी इंजिन देखभाल प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्यास मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
प्रतिनिधी. मुंबई - वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय,…
-
नौदल प्रशिक्षण सरावासाठी गेलेले आयएनएस निरीक्षक त्रिंकोमालीहून रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - श्रीलंकेच्या…
-
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी - राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या…
-
कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड…