महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी ठाणे

केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस १५ हजार

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासना व्दारे कर्मचारी यांना साहनुग्रह अनुदान १५ हजार रुपये देणार असल्याचे महापौर विनिता राणे यांनी घोषणा केली आहे यावेळी पालिका आयुक्त आणि पालिका पदाधिकारी उपस्थित होते 
कोरोना काळात कामगार आणि कर्मचारी यांनी चांगले काम केल्याचे गौरव वाचक उदगार काढून गेल्या वर्षाच्या तुलनेने १००० रुपये वाढीव देत असल्याची माहिती महापौर विनिता राणे यांनी एकूण साहनुग्रह अनुदान १५ हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे पालिका कर्मचारी यांचा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पालिकेतील एकूण ६ हजार ६७६  कामगार आणि कर्मचारी याना अनुदानाचा लाभ मिळणार आहे यावेळी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी , प्रभारी सचिव संजय जाधव, पालिका पदाधिकारी प्रकाश पेणकर, माजी महापौर रमेश जाधव , स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे , राहुल दामले , मंदार हंळबे,  उपस्थित होते .

Translate »
×