नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बँगलोर/प्रतिनिधी – एका स्तुत्य उपक्रमांतर्गत दूरसंचार विभागाने “ टेलिकॉम डिझाईन कोलॅबरेशन स्प्रिंट” या विषयावर आयोजित केलेल्या उपक्रमात स्टार्ट अप्स/एमएसएमई, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांना एकत्र आणले.दूरसंचार विभागाने आयआयआयटी बँगलोर येथे या स्प्रिंटचे आयोजन केले होते. यामध्ये रेडियो ऍक्सेस नेटवर्क(RAN)मधल्या 15 आघाडीचे स्टार्ट अप्स / एमएसएमई, प्रमुख परिसंस्था, आयआयटी मद्रास, सी-डॉट, आयआयटी दिल्ली यांसारख्या प्रतिष्ठेच्या संस्था आणि इतर नेटवर्क कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
सर्वसमावेशक 5G सोल्युशनसह सर्वसमावेशक आणि भविष्यसज्ज दूरसंचार स्टॅक विकसित करण्यासाठी आणि भविष्यातील 6G पर्यंतच्या प्रगतीसाठी एक मंच तयार करण्यासाठी डीप टेक रॅपिड आयडिएशन आणि नाविन्यपूर्ण उपायांमध्ये हे सहकार्य प्रस्थापित आहे.सामुहिक शक्तीचा लाभ घेणे,समावेशक उपायांना प्रोत्साहन देणे आणि बाजारपेठेत संधी निर्माण करणे ही या स्प्रिंटची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत.