Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
आरोग्य महत्वाच्या बातम्या

मटन खाल्ल्याने विषबाधा झालेल्या १५ जणांवर उपचार सुरु

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

यवतमाळ/प्रतिनिधी – तुम्ही जर मांसाहारी असाल तर ही बातमी वाचल्यानंतर मांस खाण्याआधी तुम्ही दहावेळा विचार कराल. मांसाचे सेवन करणारे अनेक जन शिळे मटन, चिकन अगदी आठवडाभर शिजवून खातात. पण असे करने अनेकदा जिवावर बेतू शकते. यवतमाळ जिल्ह्यात शिळ्या मटणाच्या सेवणाने तब्बल 15 नागरिकांचा जीव धोक्यात आला.

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील 15 जणांना बकऱ्याच्या मटनातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. तांडा आणि अंजी येथे काही नागरिकांनी रात्रीचे उरलेले बकऱ्याचे शिळे मटन खाल्ले. यानंतर त्यांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना त्वरित आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. शिळे मटन खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या रुग्णांमध्ये 6 महिला व 13 पुरूषांचा समावेश आहे. रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टर सुनील भवरे यांनी दिली आहे.

Translate »
X