नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – जळगाव शहरातील बालसुधार गृहातील शौचालयात १४ वर्षीय बालिकेने गळफास घेतला होता. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचारास सुरू असतांना आज तिचा मृ-त्यू झाला आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी अल्पवयीन मुलगी ही मागील काही दिवसांपासून जळगाव येथील बालसुधार गृह जिल्हा परिविक्षा निरीक्षण गृहात होती. तीला घरी जायचे होते. परंतू तिचे वडील बाहेरगावी असल्याने तिला नेणे शक्य झाले नाही. घरी जाण्याच्या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी तिने गळफास घेतला. तिच्यावर ११ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर आज तिची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.