महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
देश मुख्य बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १,३५१ उमेदवार रिंगणात

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – लोकशाही असलेल्या भारत देशात लोकसभा निवडणुकीचे स्थान फार महत्वाचे आहे. कारण जनतेच्या मतावर देशाचे भविष्य अवलंबून आहे. निवडणुकीच्या प्रचारात नेतेमंडळी नागरिकांना मोठ-मोठी आश्वासने देत आहेत. पण निवडणूका झाल्यानंतर त्यांना स्वतःची आश्वासने आठवतील का? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असेल का? अशा असंख्य प्रश्नांनी गरीब जनतेच्या मनात घर केलंय.

लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1351 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मध्यप्रदेशातील निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या 29-बैतुल (एसटी) या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या 8 उमेदवारांचा देखील समावेश आहे. तसेच गुजरातमधील सुरत मतदार संघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत 19 एप्रिल 2024 रोजी संपली. दाखल झालेल्या सर्व अर्जांच्या छाननीनंतर 1563 अर्ज वैध ठरले.

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुजरातमधील 26 लोकसभा मतदारसंघांतून सर्वाधिक 658 उमेदवारी अर्ज सादर झाले. त्याखालोखाल महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांतून 519 उमेदवारी अर्ज सादर झाले. महाराष्ट्रामध्ये 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राज्यातील सर्वाधिक 77 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 5-विलासपूर लोकसभा मतदारसंघात 68 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी 22 एप्रिल 2024 पर्यंतची मुदत होती.

Translate »
×