Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

मानवाधिकार हा तृतीयपंथीयांचा हक्क, घोषणा देत एक मैल दौड मध्ये धावले १३५ तृतीयपंथी

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/2CbEFMR1_18

ठाणे/प्रतिनिधी – ‘तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे’ अशा घोषणा देत रविवारी सकाळी सहा वाजता ठाणे जिल्ह्यातील तब्बल १३४ तृतीयपंथीय ठाण्यातील रस्त्यावर धावले. निमित्त होते एम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने आयोजित ‘एक मैल’ दौड.

ठाण्यातील पाचपाखाडी सर्व्हिस रोड येथे या ‘एक मैल’ दौडचे आयोजन करण्यात आले. १५ ते १८, १९ ते २९, ३० ते ४४, ४५ ते ६० या वयोगटातील मुले, मुली, पुरुष, महिला आणि जेष्ठांसाठी या एक मैल दौडचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तर
ठाणे जिल्ह्यातून १३५ तृतीयपंथी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

१५ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये यश माबेकर प्रथम, स्वराज गावकर द्वितीय आणि गौरव आर्या याने तृतीय क्रमांक पटकाविला. १९ ते २९ वयोगटातील मुलांमध्ये अजय यादव प्रथम, रवी सोनकर द्वितीय आणि सदाफल चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकाविला. ३० ते ४४ वयोगटातील मुलांमध्ये नारायण बागवडे प्रथम, शान सिन्हा द्वितीय तर गंधर्व शेट्टी हा तिसरा आला. ४५ वर्षांपुढील वयोगटात प्रथम अमित प्रभू, द्वितीय भास्कर कृष्णमूर्ती तर तिसरा क्रमांक शैलेश सापळे याने पटकाविला.
१५ ते १८ वयोगटातील मुलींमध्ये गायत्री शिंदे प्रथम, मीरा फाटक द्वितीय आणि अपूर्वा देशमुख हिने तृतीय क्रमांक पटकाविला. १९ ते २९ वयोगटातील मुलींमध्ये पूनम गुप्ता प्रथम, लेखना कणेकर द्वितीय आणि लता सोलंकी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ३० ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये हेता ठक्कर प्रथम, दीपल पटेल द्वितीय तर मंजिरी प्रभू यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. ४५ वर्षांपुढील महिला वयोगटात प्रथम संगीता खेतान, द्वितीय मिनी सुबोध तर तिसरा क्रमांक धरती पोंडा यांनी पटकाविला.

तृतीयपंथीमध्ये रुपाली केणे प्रथम, अंजली केणे द्वितीय आणि मलिका केणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. आयोजक डॉ. अजित कुलकर्णी यांनी यावेळी स्पर्धा आयोजित करण्या मागचा उद्देश सांगत तृतीयपंथीय खेळाडूंचे आभार मानले.

उर्मी इस्टेट चे विनोद गोवानी, संकल्प केअर चे अध्यक्ष डॉ. पी. एन. कदम, संकल्प केअर चे सीईओ सतीश रामानंदन, फ्रँकलिन चे स्वरूप भाटवडेकर, उपजिल्हाधीकारी रेवती गायकर, अक्षयशक्ती च्या संस्थापक मिनी सुबोध, महाराष्ट्र ऍथलिटिक चे माजी सहसचिव प्रसाद पाठक, स्पोर्ट्स अथॉरीटी ऑफ इंडियाच्या कायदेशीर सल्लागार गीतांजली शर्मा आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल लोकपूरम शाळेचे डॉ. राकेश यादव, रमेश दळवी, प्रमोद कुलकर्णी, वसंत विहार शाळेचे ऍथलिटिक कोच सुनील होनमाने, छत्रपती पुरस्कार विजेते श्री. म्हापुस्कर, ठाणे जिल्हा ऍथलिटिक असोसिएशनचे सचिव अशोक अहिरे, सहसचिव राजेंद्र मयेकर आदींचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X