नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे –केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असून शैक्षणिक क्षेत्रात करण्यात येत असलेल्या आवश्यक सुधारणामुळे महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२० व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक) चे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक व अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनखाली नव्या शैक्षणिक धोरणाचा मसूदा तयार करण्यात आला आहे. केंद्राने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केल्यानंतर देशातील पहिली प्राध्यापक प्रबोधिनी पुणे येथे स्थापन झाली. इन्फोसिससारख्या संस्थेशी याबाबत करार करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विविध प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल. या संपूर्ण प्रक्रीयेत विद्यापीठाचा सहभाग महत्वाचा आहे. विद्यापीठ आणि शासनाने समन्वीत प्रयत्न केल्यास राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल बदल घडवून आणता येतील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अन्या विद्यापीठांना अनुकरण करण्यासारख्या चांगल्या बाबी आहेत. विद्यापीठाने इतरही देशातील विद्यापीठांशी करार केला आहे. प्रत्येक विद्यापीठाने आपला अभ्यासक्रम बाहेरच्या देशात जाईल यासाठी विशेष प्रयत्न करावे. त्यानिमित्ताने आपले ज्ञान, संस्कृती इतर देशात जाते, असेही ते म्हणाले.
राज्यातील विद्यापीठांनी पदवीप्रदान समारंभासाठी एक दिवस निश्चित करावा आणि एकाच दिवशी राज्यातील सर्व विद्यापीठात हा समारंभ व्हावा. यामुळे एका दिवशी लाखो पदव्या देणारे राज्य म्हणून राज्याची ओळख होईल. इतरही विद्यार्थ्यांनी पदवीदान समारंभापासून प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांना पदवीदान कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. कुलगुरु डॉ.करमळकर यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात वेगळा आदर्श उभा केला आहे, असे ते म्हणाले.
मराठी भाषेच्या विकासासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. येत्या वर्षभरात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला गती देण्याचे काम करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.सामंत यांनी दिली.
डॉ.पटवर्धन म्हणाले, गुरुकुल आणि कुलगुरु पद्धती या दोन्हीमधील चांगल्या गोष्टी घेऊन नवा मार्ग स्विकारण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून, त्याविषयी माहिती घेऊन पुढे जावे लागेल. विश्वासावर आधारीत शैक्षणिक पद्धती आपल्याला विकसीत करावी लागेल. विद्यापीठात अधिकाधिक उत्तम शिक्षक येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
भारताची जागतिक नेतृत्व देण्याची क्षमता आहे. जगातील पहिली विद्यापीठे भारतात सुरू झाली. त्यामुळे आपल्या विद्यापीठांचे सक्षमीकरण करून आपल्या गरजेवर आधारीत शिक्षण पद्धती विकसीत करावी लागेल. तंत्रज्ञानामुळे शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत, यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राने सुरू केलेली प्राध्यापक प्रबोधिनी महत्वाची आहे. महाराष्ट्र देशाला नेतृत्व देणारे राज्य आहे. ही क्षमता शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. ती क्षमता पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुणे विद्यापीठ जगात पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरु डॉ.करमळकर म्हणाले, कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचे मूळ कारण शिक्षित व कौशल्य स्वयंपूर्ण मनुष्यबळात असते. या अर्थाने विद्यार्थी भारताच्या विकासाचे रचनाकार आहेत. २१ वे शतक ज्ञानाचे आणि ज्ञानाधिष्ठीत संपत्तीचे आहे. ज्ञानातून संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रीयेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाने कौशल्य विकासावर भर दिला आहे.
विद्यापीठ ज्ञान आणि कौशल्य विकासाच्या नव्या प्रवाहाशी जोडले गेल्याने राष्ट्रीय पातळीवरील मानांकनात तंत्र विद्यापीठ नसताना पुणे विद्यापीठाला आठवे मानांकन मिळाले आहे. विद्यापीठाने उद्योग संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेचा विकास आणि रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांनी अशा नव्या ज्ञानप्रवाहाशी जोडले जावे. संशोधनाच्या क्षेत्रात पुढे येताना आपल्या संस्कृतीचेही जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दीक्षांत मिरवणूकीने कार्यक्रमाला सुरूवात झाली. समारंभात ७५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. शैक्षणिक वर्ष एप्रिल /मे २०२१ या वर्षातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पीएचडी, एमफील, स्तरावरील एकूण १ लाख १८ हजार २२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १० एमफील आणि ३०९ पीएचडीधारक आहेत.
मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कुलगुरुंच्या हस्ते आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या रेणुका जगतपती सिंग यांना द प्रेसिडेंट ऑफ इंडिया शंकर दयाल शर्मा सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला अधिसभा सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
Related Posts
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केडीएमसीतर्फे अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…
-
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा…
-
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा नऊ महिन्यांनी उघडला पडदा
प्रतिनिधी. डोंबिवली - गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेले डोंबिवलीतील…
- राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन विशेष -:…
-
सोलापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी
प्रतिनिधी. सोलापूर - जिल्ह्यातील सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले अभिवादन
प्रतिनिधी. मुंबई - स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना…
-
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी महिला व बालविकास विभागाच्या वतीने सावित्री उत्सव
प्रतिनिधी. मुंबई - महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले…
-
सहा महिन्यानंतर रंगभूमीचा पडदा उघडला,डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हाऊसफुल्ल
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून अर्थात होळीपासून बंद झालेली…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्यअतिशय दुर्दैवी- छगन भुजबळ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नवी दिल्ली मधील महाराष्ट्र…
-
सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का ? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात…
-
क्रांतीबा ज्योतिबा फुले.
संघर्ष गांगुर्डे भारतीय समाज रचनेची कायापालट करून वादळ निर्माण करणारे क्रांतीबा.भारतीय स्त्रियांसाठी…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
क्रांतिबा महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त…
-
राजधानीत महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर समाजसुधारक महात्मा…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ
पुणे/प्रतिनिधी - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे…
-
पुणे विभागातून आषाढी वारीसाठी ५३० बसेसची सेवा
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र…
-
‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
प्रतिनिधी. पुणे- जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या…
-
डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात योग दिन साजरा
कल्याण/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात…
-
कल्याणच्या महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला दुचाकी गाड्यांचा विळखा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन…
-
कल्याण मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र रेखाटून अभिवादन
कल्याण प्रतिनिधी - महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून…
-
जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - हवेली तालुक्यातील मौजे पेरणे…
-
पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी. मुंबई, दि. २७ :- पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही…
-
पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई /प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग…
-
पुणे येथे राज्य महिला आयोगाकडून २८ ते ३० जूनदरम्यान जनसुनावणी
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे…
-
पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी…
-
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार
जालना/प्रतिनिधी- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने…
-
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्याचे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - अखिल भारतीय…
-
पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे…
-
पुणे सिटी इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सेलरेटर कार्यशाळेच्या समारोप
नेशन न्युज मराठी टीम पुणे - जगाला आज हरित ऊर्जेची…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुणे विजयी तर मुंबई उपविजयी
पालघर/प्रतिनिधी - पुण्याच्या खेळाडूंनी स्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १०९ गुणासह विजेतेपद पटकावले…
-
२२ फेब्रुवारीला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन
सोलापूर प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा सोळावा दीक्षांत…
-
पुणे स्मार्ट सिटी वाॕर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
प्रतिनिधी. पुणे,दि.२२-पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वाॕर रुम…
-
उबाठा पुणे जिल्हाप्रमुख व कार्यकर्ते पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड/प्रतिनिधी - उध्दव बाळासाहेब ठाकरे पुणे…
-
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळावतीने कर्ज योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू…
-
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवाचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…
-
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कांचन व्हेज हॉटेल आगीत जळून खाक
पुणे / प्रतिनिधी- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत जवळील ( शेळके…
-
पुणे येथे आफ्रिका-भारत लष्कराचा संयुक्त सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - भारत आणि आफ्रिका खंडातील…
-
आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिराव फुले जन…
-
आरोग्य महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार. सर्वसामान्य रूग्णांना दिलासा
मुंबईः राज्यातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची…
-
पुणे जिल्हातील यवत येथे जागतिक पर्यावरण दिनी,१५० देशी झाडांचे वृक्षारोपण
दौंड/हरीभाऊ बळी - दरवर्षी जागतिक पर्यावरण संरक्षण दिन ५ जूनला…
-
सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू
पुणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील…