मुंबई/प्रतिनिधी – सहा डिसेंबर म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशातून लाखोच्या संख्येने अनुयायी दादर येथील चैत्यभूमि येथे येत असतात. यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी मध्ये रेल्वेने १२ उपनगरीय विशेष गाड्या सोडण्याचा तर ९ दादर लोकल परळपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वे 6.12.2022 रोजी (5/6.12.2022 च्या मध्यरात्री) दादर-कल्याण आणि कुर्ला-पनवेल सेक्शनवर 12 उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे तर नागरिकांच्या सोयीसाठी 9 दादर टर्मिनेशन/ओरिजिनिंग ट्रेन्स परळपर्यंत धावणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांचा. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबून धावतील. तपशील खालीलप्रमाणे-
मुख्य लाईन गाड्या पुढील प्रमाणे
कुर्ला-दादर स्पेशल कुर्ल्याहून 00.45 वाजता सुटेल आणि दादरला 01.00 वाजता पोहोचेल.
कल्याण- दादर स्पेशल कल्याणहून 01.00 वाजता निघेल आणि 02.10 वाजता दादरला पोहोचेल.
ठाणे- दादर स्पेशल ठाणे येथून 02.10 वाजता सुटून दादरला 02.50 वाजता पोहोचेल.
दादर – ठाणे स्पेशल दादरहून ०१.१५ वाजता सुटून ठाण्याला १.५५ वाजता पोहोचेल.
दादर – कल्याण स्पेशल दादरहून ०२.२५ वाजता सुटेल आणि कल्याणला ३.३५ वाजता पोहोचेल.
दादर – कुर्ला स्पेशल दादरहून 03.00 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 03.15 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन गाड्या पुढील प्रमाणे
वाशी- कुर्ला स्पेशल वाशीहून 01.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.10 वाजता पोहोचेल.
पनवेल- कुर्ला स्पेशल पनवेलहून 01.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.45 वाजता पोहोचेल.
वाशी- कुर्ला स्पेशल वाशीहून 03.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 03.40 वाजता पोहोचेल.
कुर्ला-वाशी स्पेशल कुर्ल्याहून ०२.३० वाजता सुटेल आणि वाशीला ०३.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला – पनवेल स्पेशल कुर्ल्याहून ०३.०० वाजता सुटेल आणि पनवेलला ४.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला-वाशी स्पेशल कुर्ला येथून 04.00 वाजता सुटेल आणि 04.35 वाजता वाशीला पोहोचेल.
दादर टर्मिनेटिंग/ओरिजिनेटिंग ट्रेन्स परळ पर्यंत चालवल्या जातील आणि 05.12.2022, 06.12.2022 आणि 07.12.2022 (3 दिवस) रोजी परळ येथून निघतील.