महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कर्जबाजारी नोकराने १२ लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/0d5RHGfVpds?si=7RsC3tfVDLUm7Rn7

डोंबिवली / प्रतिनिधी – सोनाराच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराने मालकाच्या 12 लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे ५० हजाराचे कर्ज फेडण्यासाठी दुकान मालकाचे १२ लाखांहुन अधिक किंमतीचे दागिने घेऊन रफुचक्कार झाला होता. पण मात्र डोंबिवली रामनगर पोलिसांनी या नोकराचा तीन तासातच त्याला ठाकुर्ली रेल्वे स्थानकात बेड्या ठोकल्या आहे. विक्रम गोपाळ रावल असे अटक नोकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार बसंतीलाल चपलोत (वय ६६) यांच्या मालकीचे डोंबिवली पूर्व भागातील नेहरु रस्त्यावर प्रगती ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानात आरोपी विक्रम हा काही वर्षापासून विश्वासाने काम करतो. विक्रम विश्वासू असल्याने दुकानमालक बसंतीलाल यांनी गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास नोकर विक्रमकडे दुकानातील १२ लाख ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होलमार्क करण्यासाठी दिले होते. विक्रम ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी दुकानातून सोन्याचे दागिने घेऊन बाहेर पडला. मात्र तो दागिने घेऊन परतलाच नाही.

त्यानंतर त्यांनी होलमार्क करणाऱ्या ठिकाणी संपर्क साधला. तेथेही तो गेला नसल्याचे आढळून आले. मालक बसंतीलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात विक्रम विरुध्द तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस तपास पथके तयार करण्यात आली.

तक्रारदार यांच्या दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच शहरातील सर्व रस्त्यांवर पोलिसांनी एकाचवेळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे नोकर विक्रमचे मोबाईल लोकेशन ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांना पाहताच नोकर विक्रमने लोकलमधून पळ काढला होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या, दोन सोनसाखळी असा १२ लाख ७२ हजाराचे दागिने जप्त केले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे 12 लाखाची नुकसान होण्यापासून सोनाराला वाचवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×