नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय) अंतर्गत महाराष्ट्र युवा संघ कल्याण व स्पोर्ट्स समिती अचिव्हर्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन व सप्ताह निमित्त जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा रविवारी कल्याण मधील अचिव्हर्स महाविद्यालयात पार पडली. या युवा क्रीडा स्पर्धेत १०५ युवक युवतीं सहभागी झाले होते.
याप्रसंगी श्री ज्ञानराज माऊली शिक्षण सेवा मंडळ अध्यक्ष डॉ.महेश भिवंडीकर, स्पोर्ट्स समीती प्रमुख अनिकेत जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी राजेश यादव, राज्य युवा पुरस्कार प्राप्त खेळाडू अजित कारभारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय कटोडे, आधार सामाजिक संस्था अध्यक्ष अरविंद जयस्वाल आदींनी उपस्थित राहत खेळाडूना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमात सहभागी युवक, युवतींना भारत सरकार नेहरू युवा केंद्र ठाणे चे प्रमाणपत्र व पदक अचिव्हर्स स्कूल समीती अध्यक्ष गौरंग भिवंडीकर, माजी पोलीस उपायुक्त पंजाब पोलीस डॉ रुपिंदर मुरजानी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.