नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी– मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली ( मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली) यांचे निर्देशानुसार मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांचे आदेशानुसार सन २०२३ मधील तिसरी “राष्ट्रीय लोक अदालत ” शनिवार दि. ०९/०९/२०२३ रोजी आयोजित करण्यात आले होती. यात केडीएमसीच्या थकीत मालमत्ता करदात्यांची १०१८ प्रकरणे निकाली निघाली आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७९७३ थकीत मालमत्ता करदात्यांचे दावा दाखल पुर्व प्रकरणाच्या ( Pre litigation matters ) नोटीसा सही शिक्यासह संबंधित प्रभागामार्फत संबंधितांस वाटप करण्यास देण्यात आल्या.दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी १०१८ थकीत मालमत्ता करदात्यांनी मालमत्ताकरापोटी येणे असलेली रक्कम महापालिकेकडे जमा केली असून, एकूण रक्कमरु.२८,०१,८९,६९८/- मागणी वसूल झाली आहे.
अभय योजना-२०२३ ची मुदत दि. १५ सप्टेंबर, २०२३ पर्यत आहे. तरी, सर्व थकीत मालमत्ता करदात्यांनी याचा लाभ घ्यावा व महापालिकेस सहकार्य करुन विकासाला हाताभार लावावा असे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.