प्रतिनिधी
मुंबई – राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत गृह विभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रीया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.राज्यात 10 हजार पोलिस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलिस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमिन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. आजच्या या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलिस सेवेत दाखल होण्याची संधी मिळेलंच, त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी होण्यास,कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
Related Posts
-
कोरोनाचे आज ३०४१ नवीन रुग्ण; राज्यात एकूण ५० हजार २३१ रुग्ण-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
प्रतिनिधी . मुंबई, दि.२४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५०…
-
राज्यात स्वच्छतेत अंबाजोगाई बस स्थानक प्रथम क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - राज्यातील बस…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार रिंगणात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या…
-
राज्यात प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
राज्यात वॉन्टेड असणारी टोळी बीड पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/pIbYnKt4b-M बीड/प्रतिनिधी - राज्यात वॉन्टेड असणारा…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
नाशिकच्या जागा वाटपावर छगन भुजबळांचा खुलासा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत ड्रोन,खाजगी हेलिकॉप्टर उडविण्यास प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
कुर्ला बीकेसी येथे पोलिस शिपाई सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान
मुंबई प्रतिनिधी- कुर्ला बीकेसी येथील सेबी भवन येथे साप असल्याचे…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार
मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना…
-
वंचितची २८० ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता, तर राज्यात तीन हजार ७६९ उमेदवार विजयी
प्रतिनिधी. मुंबई - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात वंचित बहुजन…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती, पोलीस भरतीसाठी सुरुवातीला होणार शारीरिक चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने राज्यात सन…
-
आ. गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
WWW.nationnewsmarathi.com उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेतील सर्वांचे आभार ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांतून ५ लाखांहूनअधिक स्थलांतरित त्यांच्या राज्यात
प्रतिनिधी. मुंबई दि. ३०: परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
राज्यात होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून…
-
राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती – गृहमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – पोलीस भरती २०१९ मधील…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना स्मार्ट पोलिस बूथ उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपुर/प्रतिनिधी - नागपुरात उन्हाळ्यात तापमान ४५…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक…
-
छ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती
DESK MARATHI NEWS ONLINE. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - नक्षलवादयांना ज्यांच्या नावाने घाम…
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
सायबर दूतच्या माध्यमातून नाशिक पोलिस लावणार ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाना चाप
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - मागच्या काही महिन्यांपासून सायबर…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…
-
मोहोळ पोलिसांची दमदार कामगिरी, पोलिस नाईक शरद ढावरे यांचे पोलिस अधिक्षकांकडून अभिनंदन
प्रतिनिधी. मोहोळ- पोलिस नाईक शरद ढावरे मोहोळ पोलिस स्टेशन येथे…
-
एमपीएससीच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील…
-
कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपची जागा हॉस्पिटलसाठी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपच्या…
-
आतापर्यंत २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडले राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात आज १२४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…