मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10 हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून याकरीता राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि सिमेन्स लिमिटेड व टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्हज ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त काल आयोजित कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कौशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील, सिमेन्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मनमोहनसिंग कोरंगा, अनिस मोहंमद, टाटा स्ट्राईव्हचे अभिषेक धोत्रे यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने राज्यातील आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड व ठाणे या १० जिल्ह्यातील १२६ शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, टूल आणि डाय मेकर, मोटार मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग तसेच वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या आयटीआयना नजिकच्या उद्योगांशी जोडून त्याद्वारे त्या उद्योगांमध्ये उमेदवारांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आयटीआयमधील प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याचे ऑन जॉब ट्रेनिंग, द्वितीय वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्याचे ऑन जॉब ट्रेनिंग तर आयटीआयचा अंतिम निकाल घोषित झाल्यानंतर एक वर्षासाठी ॲप्रेंटीशीपची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रभाविपणे राबविण्यात येईल. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सुरु करण्यासाठी सिमेन्स लिमिटेड व टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हीज ट्र्स्ट यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले.आयटीआयमधील पायाभूत सुविधा व प्रशिक्षणाचा विकास करण्यासाठी विविध उद्योग स्वत:हून पुढाकार घेत आहेत. यासाठी आतापर्यंत ५० हून अधिक नामांकित औद्योगिक आस्थापनांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमात बांधकाम यंत्र सामुग्री आणि उद्वाहन (इलेव्हेटर्स) निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी थायसेनकृप इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासमवेतही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीद्वारे त्यांच्याकडील सीएसआर फंडामधून १ कोटी ८० लाख रुपये निधीतून औंध (जि. पुणे) येथील आयटीआयमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत वेल्डींग वर्कशॉप उभारण्यात येणार आहे. यासाठी थायसेनकृप इंडस्ट्रीजचे मुख्य वित्त अधिकारी पुलकीत गोयल आणि सुनिल सगणे यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांच्यासमवेत सामंजस्य कराराचे आदान-प्रदान केले.राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम व उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कुशल संधाता (वेल्डर) यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. थायसेनकृप इंडस्ट्रीजच्या सहयोगातून उभारण्यात येत असलेल्या वेल्डींग वर्कशॉपच्या माध्यमातून आयटीआयमधील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण उपलब्ध होईल, असे मंत्री श्री मलिक यांनी सांगितले.
Related Posts
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी,अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या 18 ते…
-
बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध,प्रत्येक वर्षी १८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. ३० ऑक्टोबर…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन कुवैतमध्ये दाखल
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- आयएनएस तीर, सुजाता आणि सीजीएस…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
धारावीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबचे वितरण
मुंबई/प्रतिनिधी – कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत.…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
पतंग उत्सवात नायलॉन मांजावर १० फेब्रुवारीपर्यंत बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची लालपरी धावणार
मुंबई/प्रतिनिधी - आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची…
-
एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार
मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना…
-
वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई/ प्रतिनिधी - वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या…
-
शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक…
-
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा
नेशन न्युज मराठी टीम. शिर्डी - चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय…
-
श्री गजानन विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे जनजागृतीचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील श्री गजानन…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ३० हजार हेक्टरी नुकसान भरपाईची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - शेती पिकांचे पंचनामे न…
-
५ हजार १८३ कुटुबांना म्हाडा’ मार्फत हक्काचे घर
पुणे/नेशन न्युज टीम - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा)…
-
लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क
प्रतिनिधी. नागपूर- ‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांतर्गत…
-
केडीएमसी प्रशासनाकडे कामगार संघटनांची २५ हजार बोनसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोवीड काळात केडीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं…
-
ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार…
-
विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ…
-
मुंबईत कला संचालनालयामार्फत १० जानेवारीपासून कला प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कला संचालनालयामार्फत 62 वे…
-
९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या…
-
सांगली एपीएमसीत हळदीला क्विंटलला ४१ हजार १०१ रूपयांचा मिळाला दर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी - सांगली कृषी उत्पन्न…
-
अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या…
-
महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मनोज गुंजाळआणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी…
-
सरकार राजकारणात व्यस्त,आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खडतर वाटेचे कष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड/प्रतिनिधी - मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या…
-
पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी…
-
मुंबईत १० मे रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत संपन्न
मुंबई :- संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे योगदान खूप मोठे…
-
सात हजार सदनिका धारकांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी - कल्याण ग्रामीण…
-
इराणी चोरट्यांकडून ट्रेनिंग घेत चैन स्नेचिंग करणारे चोरटे जेरबंद
नेशन न्यूज़ मराठी टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - मोटारसायकल वरुन पादचाऱ्यांच्या चैन…
-
डोंबिवलीत विद्यार्थ्यांना गांजा पुरवणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/3FggrzkHTgQ डोंबिवली - धुळ्यातील आदिवासी भागातून…
-
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये १८ ते १९ हजार पक्षांचे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पहिले रामसर…