महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी ठाणे

कल्याणात मोकळ्या जागेत मेडिकल वेस्ट टाकणा-या विठ्ठलकृपा हॉस्पिटलला १० हजार दंड

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्व येथील काटेमानीवली नाक्याजवळील कै. प्रल्हाद शिंदे उड्डाण पुलाच्या बाजूला मोकळ्या जागेत मेडिकल वेस्ट टाकणा-या विठ्ठलकृपा हॉस्पिटलच्या डॉ. अरुण गायकवाड यांच्याकडून १० हजार रुपयांचा प्रशासकिय अधिभार वसूल करण्यात आला आहे.

मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकला गेल्यास त्यापासून नागरिकांना अपाय होऊ शकतो, यास्तव महापालिकेच्या आरोग्य विभागाने सदर मेडिकल वेस्ट संबंधित हॉस्पिटल, क्लिनीक यांच्याकडून संकलित करुन त्याचे शास्त्रोक्त पध्दतीने उंबर्डे येथील बायोमेडिकल‍ प्रकल्पावर विघटन करणे याकरीता एजन्सीची नियुक्ती केलेली आहे. असे असतांनाही कल्याण पूर्व येथील कै. प्रल्हाद शिंदे उड्डाण पुलाच्या बाजूला मोकळ्या जागेत मोठया प्रमाणात मेडिकल वेस्टचा कचरा टाकण्यात आल्याची माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या निर्देशानुसार ड प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल, मुख्य आरोग्य निरिक्षक, प्रभारी आरोग्य निरिक्षक यांनी समक्ष पाहणी केली. मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकणारे विठ्ठलकृपा हॉस्पिटलचे डॉ. अरुण गायकवाड यांच्याकडून १०  हजार इतका  प्रशासकिय अधिभार वसूल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×