प्रतिनिधी .
ठाणे – कोव्हीड 19 रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून ठाणे परिवहनच्या दहा बसेस आता ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येणार आहेत. दहा बस ॲम्ब्युलन्स लोकाच्या सेवेत रूजू झाल्या पूर्ण क्षमतेने चालणार आहेत.
एका बसमध्ये २ बेडस् बसविण्यात आले असून ड्रायव्हरच्या केबिनपासून ॲम्ब्युलन्सचा भाग पार्टीशनच्या साहाय्याने पूर्णतः स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. सदरच्या बस ॲम्ब्युलन्स ३ पाळ्यांमध्ये चालविण्यात येणार. प्रत्येक पाळीमध्ये एक ब्रदर आणि एक अटेडंट नियुक्त करण्यात आले आहेत.
ठाणे परिवहन सेवेच्या १०बसेस कोरोना संकटकाळात रुग्णवाहिकेत रुपांतरीत करण्यात आलेल्या असून ही सेवा आजपासून रुजू करण्यात आली आहे. सेवेचा लाभ ठामपा हद्दीतील नागरिकांना होणार आहे. याप्रसंगी ठामपा आयुक्त विजय सिंघल व अधिकारी उपस्थित होते.
Related Posts