नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रीमलँड येथील एका ऑनलाइन सेंटरवर २१ फेब्रुवारी रोजी अमरावतीत मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. यात परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीच पेपर फोडला होता. यात अमरावती पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली असून, तर धक्कादायक म्हणजे एका उमेदवाराकडून नौकरीसाठी 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणातील एक आरोपी 2021 मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या घोटाळ्यातील आरोपीचा समावेश आहे. राज्यात ६७० पदासाठी मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. पण अमरावतीत या परीक्षेत गैरप्रकार झाला यामध्ये परीक्षा घेणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांसह 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर यामध्ये एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केली आहे.