महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

जे ईडी ला घाबरले ते लोक सत्तेच्या महायुतीत आलेत – आदित्य ठाकरे

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनधी – मुंबईत दोन दिवस इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीत देशात सुरु असलेल्या तानाशाही विरोधी सर्व एकत्र येत आहेत. मुंबईत राष्ट्रीय पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांचे आगमन झाले आहे.शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे ह्यांनी या बैठकी निमित्ताने आपले मत व्यक्त केले.

इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक आहे. सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र आले आहेत. आमची लढाई तानाशाहीच्या विरोधात आहे.बैठकीच्या दोन दिवसाआधी केंद्र सरकारने सिलेंडरचे भाव दोनशे रुपयाने कमी केले. भाजप आम्हाला टार्गेट करत आहे त्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे की, इंडिया देखील जिंकत आहे. जे इंडिया आघाडीवर टीका करत आहेत त्यांनी आधी सांगांव की, गुवाहाटीचा खर्च कोणी केला आहे? दसऱ्याची सभा ढापण्याचा प्रयत्न केला गेला. जे ईडी ला घाबरले ते लोक सत्तेच्या महायुतीत आले आहेत. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×